esakal | उर्सेकरांनो, द्रुतगती मार्गापर्यंत जरा सांभाळूनच
sakal

बोलून बातमी शोधा

उर्सेकरांनो, द्रुतगती मार्गापर्यंत जरा सांभाळूनच

पवन मावळात पावसाचा जोर पाहिजे तेवढा नसला, तरी संततधार पावसामुळे उर्से चौक ते द्रुतगती पुलापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे.

उर्सेकरांनो, द्रुतगती मार्गापर्यंत जरा सांभाळूनच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ (ता. मावळ) : पवन मावळात पावसाचा जोर पाहिजे तेवढा नसला, तरी संततधार पावसामुळे उर्से चौक ते द्रुतगती पुलापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचाही अंदाज येत नसल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवस करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तीन वर्षांपासून उर्से ते द्रुतगती महामार्गापर्यंतचे डांबरीकरण उखडून रस्त्यावर खडी पसरली आहे. एकीकडे कोरोनासारख्या संसर्गाला नागरिक तोंड देत असताना अपघात होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. आढे, ओझर्डे, सडवली व बऊर रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी रस्त्याच्या त्रासातून सुटले आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्गाला रस्त्याच्या भयाण संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. तात्पुरत्या कामामुळे बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी वाहनांच्या मेंटेनन्सचा खर्च वाढल्याचे वाहनचालकांनी सांगितले. या रस्त्यावर पडलेले खड्डे एवढे मोठे आहेत, की वाहनचालकांना वाहन कोणत्या बाजूने घ्यावे हा प्रश्न पडतो. दरवर्षी फिनोलेक्स केबल कंपनी गेटजवळ खड्डे व पाणी साचते. वारंवार काम करूनही येथील पाणी तुंबण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या महिन्यात या ठिकाणी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे येथील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

loading image