आंदर मावळातील वीज पुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यालगतचे विजेचे खांब पडल्यामुळे खंडीत झालेला आंदर मावळचा वीज पुरवठा महावितरणने पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत केला आहे. वडगाव (केशवनगर), कातवी, सांगवी येथील वीज पुरवठा अद्याप खंडीत आहे. विजेअभावी सोमवारी सकाळी या भागात पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. पडलेले खांब उभारण्याचे काम सुरु करण्यात आले असून संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वडगाव मावळ - रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यालगतचे विजेचे खांब पडल्यामुळे खंडीत झालेला आंदर मावळचा वीज पुरवठा महावितरणने पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत केला आहे. वडगाव (केशवनगर), कातवी, सांगवी येथील वीज पुरवठा अद्याप खंडीत आहे. विजेअभावी सोमवारी सकाळी या भागात पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. पडलेले खांब उभारण्याचे काम सुरु करण्यात आले असून संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वडगाव-कातवी परिसरात जोरदार वादळी वारे झाले. त्यामुळे एमआयडीसी रस्त्यालगचे आठ ते दहा विजेचे खांब पडले. वीज वाहक ताराही तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. वडगाव येथील केशवनगर भाग, कातवी, सांगवी व आंदर मावळातील सुमारे चाळीस गावे व वाड्या-वस्त्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन खांब दुरुस्तीचे काम होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेद्वारे काही भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले होते. आंदर मावळ, जांभूळ, कान्हे परिसराचा वीज पुरवठा चालू करण्यात यश आले मात्र वडगावचा केशवनगर भाग, सांगवी, कातवी ही गावे अंधारातच राहिली. वीज पुरवठा खंडीत असल्याने या भागात सकाळचा नळपाणी पुरवठा होऊ शकला नाही. पडलेले खांब उभारण्याच्या कामाला सकाळी सुरवात झाली असून संध्याकाळपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती महावितरणचे उप कार्यकारी अभियंता विजय जाधव व सहाय्यक अभियंता शाम दिवटे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power supply in Andar Mawal is start