esakal | गर्भवती महिलांनो कोरोनाला घाबरू नका़; स्त्रीरोग तज्ज्ञ देतायेत सल्ला

बोलून बातमी शोधा

गर्भवती महिलांनो कोरोनाला घाबरू नका़; स्त्रीरोग तज्ज्ञ देतायेत सल्ला}

कोरोना संसर्गामध्ये बाळाला जन्म द्यावा का? माझ्या बाळाला काही विकृती किंवा इजा पोहचेल का? नवव्या महिन्यांपर्यंत बाळाची वाढ नीट होईल का? गर्भवती असताना कोरोनाची लस घ्यावी की नाही? बाळ सुदृढ होइल का? सध्या अशा अनेक प्रश्नांनी गर्भवती महिलांच्या मनात नवजात शिशुच्या जन्माविषयी विचारांचे काहूर उठत आहे.

pimpri-chinchwad
गर्भवती महिलांनो कोरोनाला घाबरू नका़; स्त्रीरोग तज्ज्ञ देतायेत सल्ला
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्गामध्ये बाळाला जन्म द्यावा का? माझ्या बाळाला काही विकृती किंवा इजा पोहचेल का? नवव्या महिन्यांपर्यंत बाळाची वाढ नीट होईल का? गर्भवती असताना कोरोनाची लस घ्यावी की नाही? बाळ सुदृढ होइल का? सध्या अशा अनेक प्रश्नांनी गर्भवती महिलांच्या मनात नवजात शिशुच्या जन्माविषयी विचारांचे काहूर उठत आहे. कोरोना काळात गर्भवती महिलांना दुहेरी संघर्षाचा सामना करावा लागला आहे. परिणामी, महिलांच्या मनातील द्वंद्वात्मक परिस्थिती दूर करून प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांनी बाळाला निर्धास्त व निश्चिंतपणे जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात कोरोना काळातील सात महिन्यांत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात १३२९ महिलांची प्रसूती झाली. तीनशेहून अधिक महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. नवजात अकरा बालकांना संसर्ग झाला होता. यातून ही बालके सुखरूप बाहेर पडली. काही बालकांना केवळ ऑक्सिजन लावण्यात आले होते. माता व बालके खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे ठरले. मात्र, जन्मला आलेले प्रत्येक बाळ हे कोरोना पॉझिटिव्ह असेलच असे नाही. शिशू व आईचा संपर्क आल्यानंतर बाळाला लक्षणे दिसू लागतात. साधारणपणे दोन टक्के रुग्ण प्रसूतीदरम्यान आयसीयूमध्ये दाखल होत आहेत. तर माता मृत्यूचे प्रमाण एक टक्के आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

रुग्णवाढीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ५९४ कंटेन्मेंट झोन!

सध्या महिलांना कोरोनाकाळात बाळाला जन्माला घालावे की, काही दिवसांनी संधी घ्यावी, अशी काहीशी द्विधा मनःस्थिती झाल्याचे दिसते. कोरोना काळात जन्मलेल्या नवजात शिशुंना कोणताही धोका नाही. मातेला संसर्ग झाल्यास या काळात केवळ बाळाला स्तनपान दिले जात नाही. २१ ते २८ दिवसांपर्यंत बाळ देखरेखीखाली स्वतंत्र ठेवले जाते. बाळाला दूध पावडर व मिल्क बॅंकेतून दूध पुरवले जाते. कोरोना माता मृत्यू दर फार कमी आहे. लस घेतल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधित गर्भधारणा ठेवू शकतात.   
- डॉ. आर. राजगुरू, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्दी, खोकला, ताप किंवा तोंडाला चव नसल्यास तत्काळ शंकाचे निरसन करावे. कोरोना काळात गर्भवती महिलांना भीती होती. गर्भनिरोधकांची माहिती महिलांनी घेतली नाही. सध्या महिन्याला ६० ते ७० महिलांच्या प्रसूती होत आहेत. यामध्ये दिवसाकाठी एक ते दोन महिला कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. मनीषा सूर्यवंशी, स्त्री रोग तज्ज्ञ 

काय काळजी घ्याल... 

  • सोशल अंतर पाळा
  • सतत मास्क परिधान करा
  • गर्दीची ठिकाणे टाळा
  • वर्क फ्रॉम होमची काळजी करू नका
  • संतुलित आहार व व्यायाम करा
  • हायप्रोटीन डाएट करा
  • रक्तवाढीच्या गोळ्या व कॅल्शिअम घ्या
  • अनावश्यक प्रवास टाळा