पिंपरी-चिंचवड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित धुमाळ यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व पिंपरी शिवसेनेचे शहर संघटक अमित बाबासाहेब धुमाळ यांचे शनिवारी रात्री (ता. 1) निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेनेचे दिवगंत माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे ते चिरंजीव होत. बाबासाहेब धुमाळ यांच्या निधनानंतर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची धुरा त्यांनी सांभाळली होती. व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचा चांगला जम बसला होता. कित्येक दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. त्यांच्या मागे पत्नी व मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Pimpri-Chinchwad Transport Association Amit Dhumal passes away

टॅग्स
टॉपिकस