esakal | पोलिस असल्याची बतावणी करत घरात शिरले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

पोलिस असल्याची बतावणी करून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कोयत्याच्या धाकाने ऐवज लुटला. त्यानंतर कोयत्याने घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना चिंचवडमधील दत्तनगर येथे उघडकीस आली. 

पोलिस असल्याची बतावणी करत घरात शिरले अन्...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कोयत्याच्या धाकाने ऐवज लुटला. त्यानंतर कोयत्याने घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना चिंचवडमधील दत्तनगर येथे उघडकीस आली. 

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

सुंदर विलास ओव्हाळ (रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल कांबळे (वय 20, रा दत्तनगर, चिंचवड) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस असल्याची बतावणी करून शुक्रवारी (ता.21) पहाटे तीनच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या घरात शिरले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एक लाख दोन हजार दोनशे रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर घरातील कपाट व टीव्हीची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top