खासगी क्लासेसच्या परवानगीबाबत पिंपरीतील क्लासचालक काय म्हणाले पाहा...

खासगी क्लासेसच्या परवानगीबाबत पिंपरीतील क्लासचालक काय म्हणाले पाहा...

पिंपरी : शहरातील काही क्‍लासचालकांनी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्येही इंटरनेटचा वेग कमी असणे, वीजेचा अभाव, विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप-टॅब नसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येत्या काही महिन्यांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर क्‍लासेस बंद पडून सुशिक्षित बेरोजगार निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अटी-शर्ती घालून क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी क्‍लासचालकांकडून होत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात बहुतेक इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे क्‍लासेस घरगुती स्वरुपात चालविले जातात. तर त्यापुढील इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शिकवण्या लहान-मोठ्या खासगी क्‍लासेसकडून घेतल्या जातात. शहरात सध्या सुमारे 450 ते 500 खासगी क्‍लासेस आहेत. मात्र, प्रदीर्घ लॉकडाउनमुळे त्यातील अनेक क्‍लासेस आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडी येथील इनामदार ऍन्ड चढ्ढा अकादमीचे संचालक संजय इनामदार म्हणाले, "खासगी क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला, तरी आम्हाला त्याचे पालन करावे लागणार आहे. मात्र, सुरक्षित सामाईक अंतर आणि इतर काही अटी-शर्तींवर आम्हाला परवानगी देण्यास हरकत नसावी. सध्या काही ऑनलाइन क्‍लासेस चालू आहेत. परंतु, त्यामध्ये निरनिराळ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही समाधान होत नाही. मागील 2 ते 3 महिन्यांपासून क्‍लासेसना उत्पन्न नाही. सीईटीच्या परीक्षा होणार अथवा नाही याची शाश्‍वती नाही. त्यामुळे क्‍लासचालकांना पुढील नियोजन करणेही अवघड झाले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपळे सौदागर येथील रजत अकादमीचे चंद्रशेखर निकम म्हणाले, "2 महिन्यांपासून ऑनलाइन क्‍लासेस चालू आहेत. ऑनलाइनमुळे शिक्षक एकाच वेळेस अनेक मुलांना शिकवू शकतो. अभ्यासक्रम पीडीएफमध्ये उपलब्ध होत आहे. परंतु, वीजपुरवठा खंडित होणे, सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेट ऍक्‍सेस न मिळणे यासारख्या समस्या उद्‌भवत आहेत. मोबाईल मुलांना शिकविणे अवघड जात आहे. राज्य सरकारने प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवल्यास आम्हाला बॅचेसची संख्या वाढविता येईल. परंतु, सरकारने अटी-शर्तीवर क्‍लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी. तरच खासगी क्‍लास चालक आणि त्यांच्याकडील शिक्षक तग धरुन राहतील.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळे गुरव येथील अतुल टुटोरियल्सचे अतुल मोरे म्हणाले, "खासगी क्‍लासचालकांची परिस्थिती गंभीर आहे. क्‍लासेसच्या जागा भाड्याच्या असून, जागा मालकांकडून भाड्यात सवलत मिळत नाही. शाळा सुरू होईपर्यंत खासगी क्‍लासेसला देखील परवानगी मिळेल असे वाटत नाही. येत्या काही महिन्यांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास खासगी क्‍लासेस बंद होऊन अनेक शिक्षक व कर्मचारी बेरोजगार होतील याची भीती वाटते. त्यामुळे सरकारने क्‍लासचालकांची कार्यालये किमान सुरू करावीत. जेणेकरून पालकांना ऑनलाइन क्‍लासेसबद्दल माहिती आणि विश्‍वास देता येईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com