धन्वंतरी योजना गुंडाळण्याच्या निर्णयाचा पिंपरी-चिंचवडमध्ये निषेध 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून 'धन्वंतरी स्वास्थ्य योजना' सुरू आहे. मात्र, ही योजना बंद करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून 'धन्वंतरी स्वास्थ्य योजना' सुरू आहे. मात्र, ही योजना बंद करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. या निर्णयाविरोधात पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. 8) महापालिका प्रवेशद्वारावर काळ्या फिती बांधून दिवसभर काम करीत निषेध नोंदवला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. चिंचवडे म्हणाले, की एक सप्टेंबर 2015 पासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे. मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेऊन 15 सप्टेंबरच्या पहाटे एकनंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेऊ नये, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्तांच्या निर्णयाला कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. कोरोनाच्या महामारीत धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरत होती. प्रशासनाने योजना बंद करणे अतिशय चुकीचे आहे. आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चिंचवडे यांनी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest in pimpri chinchwad against the decision to wrap up the dhanvantari scheme