पिंपरी शहरातील बैलगाडा घाट दुरुस्तीसाठी पालिकेच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करा

पिंपरी शहरामधील प्रत्येक गावामध्ये विशेष करून समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाट अस्तित्वात आहेत.
Ushamai Dhore
Ushamai DhoreSakal
Updated on

पिंपरी - शहरामधील प्रत्येक गावामध्ये विशेष करून समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यती (Bullockcart Competition) आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाट ((Bullockcart Ghat) अस्तित्वात आहेत. आता परवानगी मिळाल्यानंतर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, परंतु गेली ११ वर्ष या बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे या बैलगाडा घाटांची दुरावस्था झालेली आहे. हे घाट स्पर्धा घेण्यायोग्य राहिलेले नाहीत. प्रत्येक गावामधील घाटाची डागडुजी दुरुस्ती आपल्याकडील उपलब्ध निधीमधून करावी. तसेच येणा-या बजेटमध्ये बैलगाडा घाटाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, असे आदेश महापौर यांनी महापालिका प्रशासनास दिले, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Ushamai Dhore
पिंपरी : 'पे ॲंड पार्क’चा पुन्हा घाट

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, क्रिडा समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसदस्य संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, नगरसेवक सिमा सावळे, आशा शेंडगे, सुलक्षणा धर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव, बैलगाडा मालक अजित बुर्डे, चेतन जाधव, अतुल बोराटे, राहुल सस्ते, निखिल बो-हाडे, तुषार सस्ते, गोटया भाऊ फुले, विनायक मोरे आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com