esakal | तक्रारदाराच्या घरातून घड्याळ चोरणारा पीएसआय निलंबित

बोलून बातमी शोधा

तक्रारदाराच्या घरातून घड्याळ चोरणारा पीएसआय निलंबित!

तक्रारदार तरुणीच्या घरातून पोलिस उपनिरीक्षकाने महागडे घड्याळ चोरल्याचा प्रकार हिंजवडी येथे घडला.

तक्रारदाराच्या घरातून घड्याळ चोरणारा पीएसआय निलंबित!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तक्रारदार तरुणीच्या घरातून पोलिस उपनिरीक्षकाने महागडे घड्याळ चोरल्याचा प्रकार हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी घड्याळ चोरणाऱ्या उपनिरीक्षकावर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

प्रशांत रेळेकर असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते हिंजवडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे. तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता असून, याबाबतची तक्रार देण्यासाठी तरुणी २४ एप्रिलला रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. घरी पोहचल्यानंतर रेळेकरने आपण खूप कंटाळलो आहे, असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. चहा पिण्यासाठी घरात गेले. त्यावेळी तरुणीची आईदेखील घरात होत्या.

हेही वाचा: फेक अकाउंटवरून शरद पवार यांना धमकी

दरम्यान, चहा पिताना रेळेकर याने चार्जिंगला लावलेले महागडे घड्याळ खिशात घातले. तरुणीने दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर रेळेकरने तरुणीचे घड्याळ परत दिले. रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी शुक्रवारी (ता. ३०) त्यांना निलंबित केले.