...तर पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू; महापौर उषा ढोरे यांची माहिती

Usha-Dhore
Usha-Dhore

पिंपरी - ‘कोरोना साखळी खंडित करण्यासाठी शनिवारी व रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात यावा. किंवा लॉकडाउन जाहीर करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली,’’ असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. बाजारपेठा फुल्ल आहेत. मंडईमध्ये गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनेक ठिकाणी केले जात नाही. काही लग्न सोहळ्यांना हजारांवर नागरिक उपस्थित राहात आहेत. दररोज हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यवाहीसाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीला पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. मात्र, संसर्ग साखळी खंडित करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांसाठी लॉकडाउन करावे किंवा प्रत्येक शनिवारी व रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळावा, अशी सूचना आयुक्त पाटील यांना केली असल्याचे महपौर ढोरे यांनी सांगितले.

जम्बो कोविड सेंटर सुरू करा 
राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए व महापालिका यांच्यातर्फे नेहरूनगर येथील मगर स्टेडियमच्या जागेवर आठशे बेड क्षमतेचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. खासगी संस्थेमार्फत तेथील रुग्णसेवा सुरू होती. मात्र, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या घटल्याने जम्बो रुग्णालय बंद केले आहे. तिथे सध्या एकही रुग्ण नाही. मात्र, सर्वसुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचे भाडे मात्र महपालिका भरत आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांचा समावेश आहे. हे रुग्णालय जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेऊन सुरू करावे, अशी सूचनाही आयुक्तांना केल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com