
Amol Kolhe
Sakal
पिंपरी : ‘‘आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबार घेण्याचा विचार करतो. त्यावेळी ‘परवानगी नाही’, असे सांगितले जाते. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद घेतला; हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता की पालकमंत्री म्हणून जनता दरबार होता? पक्षाचा कार्यक्रम असेल तर महापालिकेचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे संकेताला धरून आहे का? यातून जनतेच्या तक्रारींवर कारवाई होते का? असे प्रश्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. २४) उपस्थित केले.