Child Health : वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले
Pune Health News : अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले असून रुग्णालयातही भरती होण्याची वेळ येत आहे.
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप या आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. तीनपेक्षा अधिक दिवस ताप राहत असल्याने काही वेळा लहानग्यांना रुग्णालयातही भरती करावे लागत आहे.