Hinjewadi Encroachment
Sakal
पिंपरी-चिंचवड
Hinjewadi Encroachment : हिंजवडीत पुन्हा अतिक्रमणे अन् सर्वेक्षण; आयटी परिसरातील उपाययोजनांसाठी ‘पीएमआरडीए’चा निर्णय
PMRDA to Re-Survey Hinjewadi Encroachments : हिंजवडी परिसरात चार महिन्यांपूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करूनही पुन्हा अतिक्रमणे वाढत असल्याची शक्यता असल्याने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) ही अतिक्रमणे रोखण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण आणि उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
पिंपरी : हिंजवडी परिसरातील काही दिवसांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतरही या परिसरांत पुन्हा अतिक्रमणे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी पुन्हा अशा घटना आढळल्या आहेत. हे रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुन्हा उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी हिंजवडीत पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे.

