
Pune Metro
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : नागरिकांचा कल दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांकडे वाढत आहे. याचे चित्र पुणे मेट्रोमध्ये उमटत आहे. डिजिटल तिकिटांची संख्या तब्बल ७३.७५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पेपर तिकीट काढलेल्या प्रवाशांचे प्रमाण केवळ २६.२५ टक्के इतकेच होते.