esakal | पिंपळे गुरवमध्ये पन्नास खाटांचे कोविड सेंटर; आमदार जगताप यांच्या प्रयत्नाला यश

बोलून बातमी शोधा

पिंपळे गुरवमध्ये पन्नास खाटांचे कोविड सेंटर; आमदार जगताप यांच्या प्रयत्नाला यश
पिंपळे गुरवमध्ये पन्नास खाटांचे कोविड सेंटर; आमदार जगताप यांच्या प्रयत्नाला यश
sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरव येथे ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथील आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरूवार ता. २२ सुरू करण्यात आले. आयुश्री हॉस्पिटल कोविड केअर सेंटर, पिंपळेगुरव ७३/८, साई दर्शन ‘ए’ बिल्डिंग येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: अभिनेता मोहित रैनाला कोरोना; रुग्णालयात दाखल

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने ही रुग्णालये कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप व त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपळे गुरवमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परिसरातील पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, पिंपळे सौदागर या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळू शकेल.

"सध्याची परिस्थिती लक्षात घेता भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल."

- शंकर जगताप माजी नगरसेवक.