esakal | अभिनेता मोहित रैनाला कोरोना; रुग्णालयात दाखल

बोलून बातमी शोधा

Mohit Raina
अभिनेता मोहित रैनाला कोरोना; रुग्णालयात दाखल
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'देवों के देव महादेव' या मालिकेत शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनाला गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे मोहितने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. "मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. प्रार्थना एखाद्या चमत्काराप्रमाणे काम करतात, असं बाबा म्हणायचे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुरक्षित राहा आणि इतरांसाठी प्रार्थना करा", असं त्याने लिहिलं.

"गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मी डॉक्टरांकडे उपचारासाठी आलो आहे. कृपया सर्वांना घरातच राहा", असं लिहित त्याने रुग्णालयातील फोटो शेअर केला. गेल्या महिन्यात मोहित 'भौकाल २' या सीरिजच्या शूटिंगसाठी उत्तर भारतात होता. याशिवाय त्याच्या 'शिद्दत' या चित्रपटासाठीही शूटिंग सुरू होती.

हेही वाचा : 'मनी हाईस्ट ५'च्या प्रदर्शनाविषयी 'नेटफ्लिक्स'ची महत्त्वपूर्ण माहिती

मोहित लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केल्या आहेत. अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मोहिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. २००५ मध्ये 'मेहेर' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र 'देवों के देव महादेव' या मालिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने 'चक्रवर्तीन अशोक सम्राट' या मालिकेत अशोकाची भूमिका साकारली होती. मोहितने 'काफिर' आणि 'अ व्हायरल वेडिंग' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता.