Pimpri: नऊ फुटी अजगराला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत नऊ फुटी अजगराला जीवदान

पिंपरीत नऊ फुटी अजगराला जीवदान

पिंपरी : नेवाळे वस्ती, चिखली येथे रविवारी (ता.3)रात्री अडीचच्या सुमारास पत्र्याच्या घरात नऊ फुटांचा १८ किलाे वजनाचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून जीवदान दिले.

नेवाळे वस्ती येथील शेतकरी किरण नेवाळे यांच्या पत्र्याच्या घरात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास अजगर दिसून आला. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र वैभव कुरुंद यांना याबाबत माहिती देण्यात आली. घोणस जातीचा साप असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र कुरुंद यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात भलामोठा अजगर असल्याचे दिसून आले. त्यामुळे कुरुंद यांनी मदतीसाठी सर्पमित्र विशाल पाचंदे, शुभम पांडे, योगेश कांजवणे, राजू कदम यांना बोलावले. त्यानंतर अजगराला पकडण्यात आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. तसेच मुळशी तालुक्यातील घाेटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात अजगराला सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आले.

इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप

''अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप आहे. नऊ फुटांचा १८ किलो वजनाचा नरजातीचा सात ते सहा वर्षांचा साप आहे. त्याला नियमित खाद्य मिळाल्यास २२ फुटांपर्यंत लांबी होऊन तो २५ वर्षे जगू शकतो. नागरी वस्तीमध्ये अजगर आढळत नाही. डोंगर-दऱ्या, पहाडी भागात तो आढळतो. त्याच्या मादीची ५० ते ६० अंडी घालण्याची क्षमता असते. तसेच हा अजगर निशाचर असल्याने रात्री तो त्याचे सावज शोधत असतो. शेड्यूल वन मधील प्राणी असून याबाबत वनविभागाला माहिती दिली असल्याचे वैभव कुरुंद यांनी सांगितले.''

टॅग्स :Pimpri