Pune : पोलिसावरील कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह नेला पोलिस ठाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri crime

Pune : पोलिसावरील कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह नेला पोलिस ठाण्यात

पिंपरी : तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करीत मृतदेह पोलिस ठाण्यात नेला. मोठा जमाव असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार दिघी पोलिस ठाण्यासमोर घडला.

वृषभ जाधव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रार अर्जावरून पोलिस कर्मचारी संदीप कांबळे यांनी वृषभ यांना चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान, त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसानी दिलेल्या त्रासामुळे वृषभ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर मांडून कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण होते. कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला.

दरम्यान, कांबळे यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.