

Pune Railway Station set for major expansion with new trains and six additional platforms.
Sakal
-प्रसाद कानडे
New Trains from Pune : पुणे स्थानकावरील फलाटांची लांबी वाढविण्यासोबतच सहा नवीन फलाटांचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता दुप्पट होईल. सध्या पुणे स्थानकावरून प्रवास सुरू करणाऱ्या (ओरिजनेटिंग) रेल्वे गाड्यांची संख्या ५० आहे, पाच वर्षांत ही संख्या ६० ने वाढवून ११० होणार आहे. शिवाय पुण्याहून धावणाऱ्या ७५ रेल्वेंना १९८ डबे वाढविले जाणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार प्रवाशांची सोय होणार आहे. ६० नवीन रेल्वे गाड्यांमुळे सुमारे दीड लाख प्रवाशांची सोय होणार आहे.