esakal | Pimpri : शॉर्टकट ठरला मृत्यूला कारणीभूत
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

Pimpri : शॉर्टकट ठरला मृत्यूला कारणीभूत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला मालवाहू कंटेनरने धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी (ता. १३) रात्री ११ च्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथे घडली.

शैलेंद्रसिंग घनसिंग राजपूत (वय ४३, रा मारुंजी) असे त्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. डांगे चौकात ग्रेड सेपरेटचे काम सुरू असल्याने थेरगाव फाटा व थेरगावला जाण्यासाठी तबबल पाऊन किमीचा वळसा मारावा लागतो त्यामुळे अनेकजण वाहतूक नियमांची पर्वा न करतायेथील हॉटेल रेजेंट पासून विरुद्ध दिशेने जातात. रजपूत हे देखील शॉर्टकट मारून थेरगावकडे जात होते.

दरम्यान एका मालवाहू कंटेनरचा धक्का लागून ते मागील चकाखाली गेले. हेल्मेट असूनही त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जखमी झाले. त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही मात्र विरुद्ध दिशेने जात स्वतःच्या मृत्यस रजपूत कारणीभूत ठरल्याने मयत रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी दिली.

loading image
go to top