

Students Face Difficulty in Filling Exam Forms
Sakal
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने विविध अभ्यासक्रमांसाठी कायम नोंदणी क्रमांकाची (पीआरएन) लिंक अद्याप खुली केलेली नाही. हे क्रमांक ‘अनब्लॉक’ करण्याचे आश्वासन विद्यापीठाने वारंवार दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधीमध्ये परीक्षा देऊन पदवी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मात्र, दिलेल्या सत्रामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे ‘पीआरएन’ ब्लॉक केले आहेत.