रिंगरोडबाबत प्रश्‍नांचा भडिमार; प्रांताधिकाऱ्यांनी आटोपली बैठक

शंकांचे निरसन नाहीच
vadgav maval
vadgav mavalsakal
Updated on

वडगाव मावळ : प्रस्तावित रिंगरोडबाबतच्या (ring road)बैठकीत काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे व शंकांचे समाधानकारक निरसन झाले नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी (provincial officer) बैठक आटोपती घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पंधरा दिवसात बैठक घेण्याची घोषणा केली. (questions about the ringroad A meeting was held provincial officer)

वडगाव नगरपंचायत हद्दीतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रस्तावित रिंगरोडमध्ये बाधित आहेत. अशा वडगाव व कातवी येथील शेतकऱ्यांची बैठक प्रांत संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २४) आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मंगेश ढोरे, भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, राजेंद्र म्हाळसकर, अर्जुन ढोरे, ज्ञानेश्वर ढोरे, सतीश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, बाळकृष्ण ढोरे आदी सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते.

सोपानराव म्हाळसकर यांनी सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न झाल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या शेतातून उच्च दाब वीज वाहिनी नेताना सर्व्हिस रस्ता व वडगाव शहराला मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. ते हवेतच विरल्याचे त्यांनी सांगितले. भास्करराव म्हाळसकर यांनी जमिनी देऊनही शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या मनस्तापाबाबत संताप व्यक्त केला. सद्यःस्थितीत येथे असलेल्या एमआयडीसी रस्त्यासाठी जमीन देऊनही पेट्रोल पंप टाकण्यासाठी विविध विभागाच्या परवानग्या घेण्यासाठी पाच वर्षे हेलपाटे मारावे लागले, वीस ते बावीस लाख रुपये खर्च करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

vadgav maval
मणिपूर सरकारचं चानूला 1 कोटीचं बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा

"प्रस्तावित रिंगरोडमुळे भरपूर फायदे मिळणार असून, या परिसराचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांना रेडिरेकनरच्या तीन ते पाच पट एकरकमी मोबदला मिळणार आहे," अशी माहीती प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.

याबाबत नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले,‘पीएमआरडीए’ने काही भागांत रिंगरोडची रुंदी ८३ मीटर असल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार या भागातही तेवढीच ठेवण्यात यावी. रिंगरोडच्या दोन्ही बाजूला किमान बारा मीटरचा सर्व्हिस रोड करण्यात यावा. रेडिरेकनरच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, आदी मागण्या केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com