
Pimpri Railway Station
Sakal
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रेल्वे स्थानकांवर चोरी, लुटमार करणाऱ्यांसह भिक्षेकऱ्यांचा त्रास वाढला आहे. प्रामुख्याने दापोडी, कासारवाडी, पिंपरी, आकुर्डी, बेगडेवाडी, घोरावडी आणि वडगाव या स्थानकांवर ‘जीआरपी’ आणि ‘आरपीएफ’ तैनात नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. दरम्यान, संबंधित स्थानकांवर सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, यासाठी रेल्वेच्या वाणिज्य विभागाने सुरक्षा विभागाला पत्राद्वारे सुचविले आहे.