
Dhanora Floods
Sakal
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून धानोरा खुर्द ते देवळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीन सह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.