esakal | नेहमी स्वच्छ असणाऱ्या मोशी प्राधिकरणाची सध्याची ही अवस्था बघा   
sakal

बोलून बातमी शोधा

नेहमी स्वच्छ असणाऱ्या मोशी प्राधिकरणाची सध्याची ही अवस्था बघा   

तुंबलेलं चेंबर, रस्त्यांवर साचलेलं पावसाचं पाणी, पदपथावर वाढलेलं गवत, टाकून दिलेल्या रेडियमच्या पट्ट्या, अशी अवस्था मोशी प्राधिकरणातील काही रस्त्यांची झाली आहे.

नेहमी स्वच्छ असणाऱ्या मोशी प्राधिकरणाची सध्याची ही अवस्था बघा   

sakal_logo
By
श्रावण जाधव

मोशी : तुंबलेलं चेंबर, रस्त्यांवर साचलेलं पावसाचं पाणी, पदपथावर वाढलेलं गवत, टाकून दिलेल्या रेडियमच्या पट्ट्या, अशी अवस्था मोशी प्राधिकरणातील काही रस्त्यांची झाली आहे. त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आलं असून, रस्त्यावरून ये-जा करणं अवघड झालंय. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन रस्ते स्वच्छ करावेत, अशी मागणी नागरिकांनी केलीय. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी 

  • रस्त्यांची स्वच्छता स्वीपर व्हॅन व सफाई कर्मचाऱ्याकडून व्हायची 
  • सर्व रस्ते, चौक, पदपथ स्वच्छ होते 
  • शुद्ध व ताजी हवा मिळायची 
  • पादचारी सहजतेने ये-जा करायचे 
  • रस्ता, पदपथांवर हातगाड्या, पथारीवाले नव्हते 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता 

  • काही महिन्यांपासून स्वीपर व्हॅन नाही, कर्मचारी कधीतरीच दिसतात 
  • रस्ते, चौक, पदपथांवर कचरा 
  • तुंबलेले गटार, साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी 
  • रस्ते, पदपथांवर कचरा, वाढलेले गवत 
  • विविध चौक, रस्त्यांवर हातगाड्या, पथारीवाल्यांचे वास्तव्य 

पूर्वी ज्याप्रमाणे रस्त्यांची स्वच्छता व्हायची, तशी सध्या होत नाही. विविध रस्त्यांवर पावसाचे व गटारांचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
- निखिल काळकुटे, नागरिक, पेठ क्रमांक 6, प्राधिकरण 

आधीच कोरोनाचा संसर्ग आहे. त्यातच परिसरात तुंबलेली गटारे, विविध प्रकारच्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 
- कौतिक उसरे, नागरिक, पेठ क्रमांक 6, प्राधिकरण 

पूर्वी रस्ते सफाईसाठी स्वीपर मशिन वापरत होते. सध्या त्यांचा ठेका संपल्याने मशिन बंद आहेत. आता केवळ स्वच्छता कर्मचारी सफाई करतात. येत्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण प्राधिकरण परिसराची स्वच्छता करून घेण्यात येईल. 
- विजय ढवाळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका 

आरटीओ रस्त्यावर पडलेल्या रेडियमच्या पट्ट्या उचलण्यासाठी कर्मचारी लावलेले आहेत. त्या पट्ट्या टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
- विजय चौटाळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका 
 

loading image