एकसष्टीत राजेंद्र चोथे यांचा सहा हजार किलोमीटरचा सायकलप्रवास!

राजेंद्र चोथे यांनी २२ फेब्रुवारीला एम्पायर इस्टेट, चिंचवड येथून प्रवासाला सुरुवात केली.
Rajendra Chothe
Rajendra ChotheSakal
Summary

राजेंद्र चोथे यांनी २२ फेब्रुवारीला एम्पायर इस्टेट, चिंचवड येथून प्रवासाला सुरुवात केली.

पिंपरी - वाढते प्रदूषण, (Polution) त्याचे मानवी आरोग्यावर (Health) होणारे दुष्परिणाम, निसर्गाचा ऱ्हास याबाबत जनजागृती (Awareness) करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील राजेंद्र चोथे (Rajendra Chothe) यांनी वयाच्या ६१व्या वर्षी पुणे-नेपाळ-पुणे असा तब्बल सहा हजार किलोमीटरचा प्रवास (Journey) पूर्ण केला. एकूण ४७ दिवसांत सात राज्यांमध्ये त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी (Environment Security) हा अनोखा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले.

राजेंद्र चोथे यांनी २२ फेब्रुवारीला एम्पायर इस्टेट, चिंचवड येथून प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ गाठले. त्यानंतर परतीचा प्रवास नेपाळ, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र या मार्गे केला. दरम्यान, नाशिक त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर ही ज्योतिर्लिंग तसेच अयोध्या, सीतामढी ही धार्मिक ठिकाणे हेमलकसा, आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थक्षेत्र कपिलवस्तू, लुम्बिनी, अजंठा वेरूळ, खजुरो मंदिर, प्रयागराज, खुशीनगर, गया, आनंदवन, शेगाव, सेवाग्राम आदी ठिकाणी भेट दिली. पुणे ते नेपाळ मोहिमेत त्यांनी स्वच्छता, पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण याबाबत जनजागृती स्वखर्चाने केली.

ते दररोज टाटा मोटर्समध्ये सायकलवर जात असत. वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत पुणे ते शिर्डी, पुणे ते गोवा, पुणे ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. चोथे यांची स्नुषा डॉ. श्वेतांबरी चोथे यांनी आयुष्य दोन चाकाचे ही स्वरचित कविता मोहिमेनंतर सादर केली.

चोथे म्हणाले, ‘‘नवीन पिढीने यातून बोध घेऊन स्वतः:मध्ये बदल करणे आवश्यक आहे.’’ एम्पायर इस्टेट मित्र मंडळ आणि इतर विविध संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. अॅड. दिलीप पाटील, संजय साळवी, अशोक मोरे, रामदास माळी, सुरेश व्यास, डॉ. हिंदुराव मोहिते, मीनाक्षी संकपाळ, कविता मोरे, संतोष पिंगळे, राम खेडकर, विकास चौधरी, विक्रम मुडपे, समीर दळवी, टाटा मोटर्समधील आजी-माजी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com