esakal | बांधकाम साइटवर मटेरिअल टाकण्यासाठी घेतली खंडणी; तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी

पिंपरी: बांधकाम साइटवर मटेरिअल टाकण्यासाठी घेतली खंडणी; तिघांना अटक

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी: बांधकाम साइटवर आरएमसी मटेरिअल टाकण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करीत ४५ हजारांची खंडणी घेतली. तसेच बांधकाम साइटवर काँक्रिटचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून तीस हजार रुपये घेत फोनवरून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार चऱ्होलीतील काळजेवाडी येथील बांधकाम साइटवर घडला.

हेही वाचा: पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सत्यवान ज्ञानेश्वर तापकीर (वय ४६), आकाश सत्‍यवान तापकीर (वय २५), सागर सत्यवान तापकीर (वय २३, तिघेही रा. काळजेवाडी, चऱ्होली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज नरेश गुप्ता (रा. सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण, निगडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची काळजेवाडी येथे आवनी आवास नावाची बांधकाम साइट सुरू आहे. या बांधकाम साइटवर मटेरिअल टाकण्यासाठी आरोपींनी आरएमसी कॉन्ट्रॅक्टर चव्हाण यांना पन्नास हजारांची खंडणी मागितली.

तसेच दमदाटी करून चव्हाण यांच्याकडून ४५ हजार रुपयांची खंडणी घेतली. फिर्यादी यांच्या बांधकाम साइटवर हरीश पटेल हे काँक्रिटचे काम करतात. आरोपी आकाश याने पटेल यांना धमकी देऊन ३० हजारांची रक्कम घेतली. तर १० सप्टेंबरला आरोपी सत्यवान याने पटेल यांना फोन करून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची व साइटवर येऊ न देण्याची धमकी दिली. दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top