

Ravet Traffic Jam
sakal
Ravet Daily Traffic Problem : रावेत परिसरात वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. मुकाई चौक, भोंडवे चौक, रावेत पंपिंग स्टेशन चौक, बीआरटी मार्ग तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणारे मार्ग येथे सकाळ-सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तर पुणे ते मुंबई महामार्गालाही या कोंडीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.