House Investment : पिंपरी-चिंचवडमध्ये घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ

पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागात विशेषतः हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी येथे सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.
homes
homessakal
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागात विशेषतः हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी येथे सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. या भागातील वाढती कनेक्टिव्हिटी, आयटी पार्कचे सानिध्य, मेट्रो प्रकल्प, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि हॉटेल्स यामुळे नागरिकांचा या भागाकडे वाढता कल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.​

पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागात म्हणजेच हिंजवडी, वाकड, पुनावळे, रावेत, ताथवडे, किवळे येथे घर खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन, पुणे रिंग रोड आणि विस्तारित महामार्गांमुळे या भागाची पुणे शहराशी आणि मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

​पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुन्या पुणे-बंगलोर महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे प्रवास सुलभ झाला आहे. अंतर्गत विस्तारित रस्ते, जागोजागी उड्डाणपूल, आवश्यक तेथे भुयारी मार्ग आणि जलद बीआरटी मार्गातून प्रवास फायद्याचा ठरत आहे.

विशेषतः वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि किवळे भागातील मल्टिप्सेशालिटी हॉस्पिटल्स, दर्जेदार शिक्षण संस्था, मॅनेजमेंट कोर्सेसची कॉलेजेस, उच्चतम बाजारपेठा आणि मोठमोठे मॉल्स यामुळे २, ३, ४ बीएचके फ्लॅट्स आणि कमर्सिएल प्रॉपर्टीज खरेदी करण्याकडे उच्चभ्रू वर्गाचा कल वाढला आहे.

उद्योग, आयटी हबचे आकर्षण

हिंजवडी आयटी पार्क, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र आणि चाकण, तळेगाव यांसारख्या औद्योगिक वसाहतींच्या भागात नोकरीच्या संधी भरपूर आहेत. पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागातून औद्योगिक भागात दळणवळणाची साधने आणि प्रवासाची उत्तम सोय असल्यामुळे चाकण, तळेगाव, हिंजवडी औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवडच्या या भागात राहणे फायद्याचे ठरते.

आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे

शहराच्या पश्चिम भागातील सरासरी घरांचे दर ५,००० ते ६,००० प्रति चौरस फूट पासून सुरु आहेत. पुण्यातील इतर भागांपेक्षा तुलनेने हे दर कमी असल्यामुळे नागरिकांना परवडणारे ठरतात. ​अनेक आलिशान गृह प्रकल्पांमध्ये १, २ आणि ३ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत. त्याचे दर मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे आहेत.​ मागील वर्षी या भागात हजारो कोटींची उलाढाल झाली आहे.

गुंतवणुकीची उत्तम संधी

पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागात पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सुधारणा, वाढती मागणी आणि भाडे दरांमध्ये वाढ यामुळे या भागातील मालमत्तेचे मूल्य भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. घर खरेदी करणे हे केवळ निवासासाठीच नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही फायदेशीर ठरणारे आहे. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, परवडणारे दर, उद्योग व आयटी हबचे सानिध्य आणि आधुनिक सुविधांनी युक्त प्रकल्प यामुळे हा भाग घर खरेदीसाठी आदर्श ठिकाण आहे.

शहराच्या पश्चिम भागाला लागून सोमाटणे येथे निसर्गाच्या सानिध्यात सुसज्ज प्रकल्पाची रचना केली आहे. मुंबई-बंगळूर हायवे, पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, रेल्वे ही कनेक्टिविटी आहे. हिंजवडी आयटी पार्कचे अंतर अवघ्या काही मिनिटांचे आहे. शहरातील मेट्रो तळेगावपर्यंत नियोजित आहे.

उर्से, चाकण, तळेगाव एमआयडीसीला जोडणारा हा भाग आहे. १६ फ्लोअरचे ११ टॉवर असून १, २, ३ बीएचके एकूण १५०० फ्लॅट्स आहेत. ३१ प्लस अॅमेनिटीज असून पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईकरांची सुद्धा फ्लॅट्स घेण्यास पसंती मिळत आहे.

- प्रमोद नरसाळे, डायरेक्टर, सुरभी ग्रुप

शहराच्या पश्चिम भागाची कनेक्टिविटी आणि पायाभूत सुविधांचा विकास हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. प्रवास करत स्टॉपवर आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात घरी पोहोचता येते. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी आयटी क्षेत्र येथून अत्यंत जवळ पडते. सुसज्ज रस्ते, मेट्रो, बीआरटीमुळे या भागातील घरांना अधिक पसंती मिळत आहे.

फ्लॅट घेण्यासाठी ग्राहक अजिबात कॉम्प्रमाईज करत नाहीत. १ बीएचके घेणारा ग्राहक भविष्याचा विचार करुन ३ बीएचके घेत आहे. २ बीएचके घेणारा ग्राहक ४ बीएचके घेत आहे. नोकरदार, व्यापारी, उद्योजकांची अधिक पसंती आहे.

- रामकुमार शर्मा, डायरेक्टर, आरके ग्रुप ऑफ कंपनी

‘पुनावळे येथील २० फ्लोअरच्या प्रोजेक्टमध्ये २ आणि ३ बीएचके वास्तू कम्प्लाईंट्स फ्लॅट आहेत. आयटी क्षेत्राची पार्श्वभूमी असणाऱ्या ग्राहकांना प्रोजेक्टमध्ये फिटनेस सेंटर, सोसायटी ऑफिस, पार्किंगमध्ये ईव्ही कार चार्जिंग प्रोव्हिजन, प्ले एरिया या महत्त्वाच्या अॅमेनिटीजसह इतर सुविधा आहे.

आपल्या प्रकल्पात भविष्याचा वेध घेणाऱ्या सोयी सुविधा असल्यामुळे ३० ते ४५ वयोगटातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. फ्लॅटच्या तिन्ही बाजूंनी खेळती हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.

- कौस्तुभ तळेकर, डायरेक्टर, २४ लाइफ अल्टा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com