पिंपरी - महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या सात महिन्यांत ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. नागरिकांचा प्रतिसाद, विभागाचे नियोजन आणि सवलतींचा लाभ यामुळेच कर संकलनात विक्रमी वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.