
आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
पिंपरी - आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.
Edited By - Prashant Patil