Religious Pressure : शिरूरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आमदार लांडगे यांच्या भूमिकेनंतर कारवाई
MLA Mahesh Landge : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील उचाळेवस्तीत धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्याच्या प्रकारानंतर आमदार महेश लांडगे यांच्या तक्रारीनंतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील उचाळेवस्ती येथे धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आमदार महेश लांडगे यांनी शिरूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.