सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढणार; सुनील शेळके यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

‘जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही. नगरपरिषदेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत त्यांना सोडणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यात रिझल्ट देऊ,’’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात दिला.

लोणावळा - ‘जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही. नगरपरिषदेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत त्यांना सोडणार नाही. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यात रिझल्ट देऊ,’’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात दिला. 

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुमार रिसॉर्ट येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शेळके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक राजू बच्चे, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नंदूशेठ वाळंज, गणेश खांडगे, सुवर्णा राऊत, मंजू वाघ, विठ्ठलराव शिंदे, राजू बोराटी, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टपरीधारक, व्यापाऱ्यांना अतिक्रमणांच्या नोटिसा बजावण्यात आल्या, जो विरोध करतो त्याला नोटिसा बजावण्यात येतात. तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो, असा थेट इशारा शेळके यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. मेळाव्यात मुरलीधर जाधव, ऋषी कांकरिया, रज्जाक पठाण, अमन पठाण, नासिर तांबोळे, फिरोज पठाण, नूरमहंमद शेख, विकास गायकवाड आदींसह खंडाळ्यातील बॅटरी हिल येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

पोलिस कार्यालयासमोर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; मालकाचा पत्ता लागताच बसला धक्का

नगराध्यक्ष, नगरसेवकांचा निषेध
रुग्णालयासाठी ४१ कोटी, पुलांसाठी साडेतीन कोटी; तर आयटीआयसाठी दोन कोटींचा निधी दिला. सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेवकांची कामे घ्या, ठरावांची मंजुरी घ्या असे स्वतः आवाहन केले. जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थान किंवा ठोक तरतुदींच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटींचा निधी सत्ताधाऱ्यांनी ठराव न घेता जाणीवपूर्वक डावलला, असा आरोप करत आमदार शेळके यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निषेध केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove files corruption authorities Sunil Shelake Warning Politics