मावळातील 'या' गावांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढला नवा आदेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी हा आदेश काढला आहे.

कामशेत (ता. मावळ) : कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेल्या मावळ तालुक्यातील कामशेत, माळवाडी आणि सोमाटणे येथे प्रतिबंधित झोन घोषित करण्यात आला आहे. मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी हा आदेश काढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कामशेतजवळील नायगाव, येवलेवाडी, खामशेत, माळवाडी शेजारील इंदोरी, मनोहरनगर, विद्याविहार कॉलनी, सोमाटणे जवळचे शिरगाव बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता बाकी व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात पूर्व तपासणी शिवाय प्रवेश देता येणार नाही. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवली जाणार आहे.

हेही वाचा- Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं घर, वाचा सविस्तर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजमितीला कामशेत येथील दोन, माळवाडीतील चार व सोमाटणेतील सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी कामशेत मधील नऊ महिन्याच्या बालकाने, माळवाडी महिलेने कोरोनावर मात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restricted zones were declared at kamshet, malwadi and somatane in maval taluka