
वडगाव मावळ,ता.२३: मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील शेतकरी गणेश मधुकर लष्करी यांनी ड्रम सिडर या यंत्राचा वापर करून भात पेरणी केली आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने तालुक्यात प्रथमच या यंत्राचा वापर करून भात पेरणीचा प्रयोग होत आहे.
भात पेरणीचे हे नवीन यंत्र कोईमतूर येथील तामिळनाडू अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने विकसित व प्रमाणित केलेले आहे. या यंत्रात डमरूच्या आकाराचे व २०० मिलीमीटर व्यासाचे चार सीड ड्रम आहेत. दाणे खाली पडण्यासाठी प्रत्येक ड्रमला नऊ मिलीमीटर व्यासाची आठ छिद्रे आहेत. तसेच दाणे एकसारखे खाली पडण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका ड्रमच्या साहाय्याने दोन ओळी अशा प्रकारे चार ड्रमच्या सहाय्याने एका वेळी आठ ओळीत २० सेंटीमीटर अंतर ठेऊन पेरणी करता येते. यंत्राच्या दोन्ही बाजूला दोन फूट व्यासाचे प्लॅस्टिकचे व्हील बसविण्यात आले आहेत. वडेश्वर येथील गणेश लष्करी यांच्या शेतात या यंत्राचा वापर करून भात पेरणी करण्यात आली. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त पेरणी होते. बियाणांची बचत होते व भात लावणीच्या वेळी मजुरी खर्चात बचत होते अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी दिली.
जगातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय 'या' राज्यात सुरु होणार; वाचा किती असेल क्षमता
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडल कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी, वडगाव कृषी पर्यवेक्षक उत्तम भांड, वडेश्वरचे कृषी सहाय्यक बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
भारत भारत भारत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.