esakal | रिक्षाचालकांनो, .....तर तुमच्यावर होऊ शकते कडक कारवाई!
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw

गणवेश परिधान न करता बॅच बिल्ला, परवाना व कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या रिक्षाचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल केल्यानंतर रिक्षाचालकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रिक्षाचालक गणवेश परिधान न करता बॅच बिल्ला व कागदपत्रे जवळ न बाळगता प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून येत आहे.

रिक्षाचालकांनो, .....तर तुमच्यावर होऊ शकते कडक कारवाई!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गणवेश परिधान न करता बॅच बिल्ला, परवाना व कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या रिक्षाचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल केल्यानंतर रिक्षाचालकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रिक्षाचालक गणवेश परिधान न करता बॅच बिल्ला व कागदपत्रे जवळ न बाळगता प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क परिधान करण्यासह सॅनिटायझर ठेवणे व चालक-प्रवासी यांच्यात प्लॅस्टिकचा पडदा लावणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासह चौकांमध्ये व रस्त्यावर अस्ताव्यस्तरित्या रिक्षा उभ्या केलेल्या असतात. 

सणामुळे पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा पुन्हा फुलल्या 

अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तरी येत्या सात दिवसात बॅच बिल्ला, परवाना व रिक्षाची कागदपत्रे आदींची पूर्तता करण्यासह रिक्षाचालकांनी स्वच्छ गणवेश परिधान करावेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी दिला आहे. 

Edited By - Prashant Patil