Pune Crime
Sakal
पिंपरी-चिंचवड
Pune Crime : प्रेमाच्या नात्यात संशयाची वावटळ; वाढते हिंसाचाराचे प्रकार
Love Turns Fatal : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत संशयामुळे आणि प्रेमसंबंधांना विरोध केल्याने वैवाहिक वादांची परिणती टोकाचा निर्णय घेत खुनी हल्ले आणि हत्येमध्ये होत असल्याचे धक्कादायक गुन्हे वाढले आहेत, ही बाब गंभीर चिंता व्यक्त करणारी आहे.
मंगेश पांडे
पिंपरी : आधी एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घ्यायच्या, गुलाबी सप्ने रंगवायची, प्रेमाने वेडेपिसे व्हायचे...मग दोनाचे चार हात करीत रेशमी नाते विवाहबंधनात रूपांतरित करायचे....आणि मग काही दिवसांतच त्याने तिच्याविषयी किंवा तिने तिच्याविषयी संशयाने वेडेपिसे व्हायचे...याची परिणती टोकाचा निर्णय घेत थेट खुनी हल्ल्यातच नव्हे तर हत्येत होत असल्याचे धक्कादायक प्रकार वाढत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढत आहेत. जोडपी टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे प्राणघातक हल्ला, खून असे गुन्हे वाढत आहेत.