मोशी प्राधिकरणातील रस्ते झाले चकाचक; 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

तुंबलेलं चेबर, रस्तावर साचलेले पावसाचं पाणी, चिखल, कचरा, पदपथावर वाढलेले गवत अशी अवस्था आहे सध्या मोशी प्राधिकरणातील काही रस्त्यांची. त्यामुळे आरोग्याच्या समस्येसह स्थानिक नागरिक व ये-जा करणे अवघड होत आहे. संबंधितांनी प्राधिकरणातील रस्ते स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केले आहे. या मथळ्याखाली शनिवारी (ता. 11) दैनिक सकाळमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मोशी - तुंबलेलं चेबर, रस्तावर साचलेले पावसाचं पाणी, चिखल, कचरा, पदपथावर वाढलेले गवत अशी अवस्था आहे सध्या मोशी प्राधिकरणातील काही रस्त्यांची. 

त्यामुळे आरोग्याच्या समस्येसह स्थानिक नागरिक व ये-जा करणे अवघड होत आहे. संबंधितांनी प्राधिकरणातील रस्ते स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केले आहे. या मथळ्याखाली शनिवारी (ता. 11) दैनिक सकाळमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या चार दिवसांत प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4 व 6 मधील सर्व रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाॅईंटर -
1) सफाई कर्मचारी यांच्या साहाय्याने सफाई करण्यात आली.
2) सर्व रस्ते, चौक, पदपथ स्वच्छ करण्यात आले. 
3) स्वच्छतेमुळे सध्या शुद्ध व ताजी हवा मिळत आहे. 
4) पादचारी सहजतेने ये-जा करत आहेत. 
5) रस्त्यावर रेडियमच्या पट्ट्या टाकणारे, कचरा करणारे व थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

दैनिक सकाळला नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिसर स्वच्छ केल्याने समाधान वाटत आहे. 
- निखिल काळकुटे व कौतिक उसरे, मोशी प्राधिकरण. 

मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4 व 6 मधील सर्व रस्ते, पदपथ, चौक स्वच्छ करण्यात आले आहेत. तसेच कचरा करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 
- विजय ढवाळे, राजेश चटोले, आरोग्य निरीक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roads Mosaic Authority became the result glowing sakal news