कामशेत : नायगावजवळ तरुणाला लुटले; 22 हजारांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

- 22 हजार रूपयांचा ऐवज लुटला.

कामशेत : नायगाव येथे एका ढब्बाच्या पार्किंगमध्ये येत असलेल्या एक तरूणाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटले. त्याच्या जवळील 22 हजार रूपयांचा ऐवज लुटला. गणेश महादेव सोनवणे (वय-२४) रा.बावी ता. आष्टी जि. बीड असे येथे लुटलेल्या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शनिवारी (ता.४) ला पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सोनवणे बब्बी ढब्बाच्या पार्किंगमध्ये येत असताना मोटार सायकल क्रमांक एमएच १२ पीएल ७८४९ वरून आलेल्या चोराने त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड लुटून पोबारा केला. पुढील तपास ठाणे अंमलदार संतोष घोलप करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbed youth near Naigaon in Kamshet Pune