देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर आरपीआयचे 'या' मागणीसाठी आमरण उपोषण  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

कोरोनाच्या काळात देहूरोड हद्दीत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात झाल्याची तक्रार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

देहू : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बेकायदा आणि अनधिकृत बांधकामांवर बोर्ड प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीसाठी देहूरोड, मावळ, पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने बोर्डाच्या कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. 13) आमरण उपोषणास सुरुवात झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळात देहूरोड हद्दीत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात झाल्याची तक्रार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष अमित छाजेड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी हरेश देखणे, पंढरीनाथ जाधव, विष्णुदास भोसले, पुरुषोत्तम पवार, लक्ष्मण ढिकाव, सविता घोरपडे, नितीन गायकवाड व इतर उपस्थित होते. 

किती आहे मावळातील धरणांमध्ये पाणीसाठा?

मावळ : कंपनीच्या जनरल मॅनेजरवर हल्ला करणारा सूत्रधार अखेर गजाआड

याबाबत बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले, की बोर्डाच्या हद्दीत बेकायदा बांधकामे सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्यासाठी बोर्ड कार्यवाही सुरू करणार आहे. मात्र, सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शहरात आहेत. तसेच, कारवाईसाठी पोलिस आणि मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागितला आहे. तसेच उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI's fast in front of Dehuroad Cantonment Board office