Helmet
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देणे शासन निर्णयानुसार शोरूमचालकांना बंधनकारक आहे. पण, या नियमाला केराची टोपली दाखवली जात असताना त्यांच्यावर मात्र ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे एक ते ३१ जानेवारीदरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ नावापुरतेच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.