Sakal Natya Mahotsav : धकाधकीच्या जीवनात नाटकाचा विरंगुळा महत्त्‍वाचा

सकाळ नाट्य महोत्सवाची पर्वणी उद्यापासून.
Sakal Natya Mahotsav 2024
Sakal Natya Mahotsav 2024sakal

पिंपरी - हसता हसता पुरेवाट करणारी व नकळत आपल्या डोळ्यांत पाणी आणणारी कलाकृती म्हणजे नाटक. अशाच काही गाजलेल्या कलाकृतींचा अनुभव सकाळ नाट्य महोत्सवात घेता येणार आहे. शहरातील नाट्य प्रेमींसाठी १० ते १२ मे दरम्यान सकाळ माध्यम समूहाच्यावतीने या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकप्रिय कलाकारांच्या गाजलेल्या नाटकांचा आस्वाद यावेळी शहरवासीयांना घेता येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये भाऊ कदम, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, ओंकार भोजने, काजल काटे, प्रिया करमरकर, अमोल कुलकर्णी आदी कलाकार आपली कला सादर करतील.

महोत्सवाची सुरवात शुक्रवारी (ता.१०) ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या निखळ मनोरंजनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. ज्यामध्ये कवितांसोबतच गप्पा, किस्से, गाणी यांचा समावेश असेल. तर कौटुंबिक विषयावरील ‘तू म्हणशील तसं !’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी (ता.११) होईल. महोत्सवाची सांगता रविवारी (ता.१२) ‘करून गेलो गाव’ या नाटकाने होईल.

भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा सहभाग असणारे हे नाटक कोकणातील जमिनी व तेथील भूमीपुत्रांची परिस्थिती या विषयावर बेतलेले आहे. त्यामुळे, तीन दिवस तीन विविध विषय मांडणाऱ्या कलाकृती रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्यामुळे, हा विकेंड तणावमुक्त घालवायचा असेल; तर या नाट्य महोत्सवाचा जरूर आस्वाद घ्या, असे आवाहन नाट्य कलाकारांनी केले आहे.

या नाट्य महोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आणि सोमाटणे येथील सुरभी सिटी हे आहेत. तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.

‘सकाळ’ नेहमीच समाजातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. या नाट्य महोत्सवामुळे रसिकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. ‘सकाळ’ने असेच उपक्रम राबवावेत अशा आमच्या शुभेच्छा.

- शिरीष देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक, बुलडाणा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

नाट्य बुकिंगसाठी...

ऑनलाइन बुकिंग

https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app

फोन बुकिंग - ८९७५२३७०४१

अधिक माहितीसाठी संपर्क

सचिन - ९७३०९५९६९९

महोत्सवाचे वेळापत्रक

1) शुक्रवार (ता. १०) रात्री - ९.३० वा. - संकर्षण व्हाया स्पृहा

2) शनिवार (ता. ११) रात्री - ९.३० वा. - तू म्हणशील तसं !

3) रविवार (ता. १२) सायंकाळी ६ वा. - करून गेलो गाव

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)

  • सीझन तिकीट (तळमजला) - १००० रुपये

  • सीझन तिकीट (बाल्कनी) - ८०० रुपये

  • प्रतिनाटक तिकीट (तळमजला) - ४०० रुपये

  • प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) - ३०० रुपये

वृत्तपत्र व नाटक ही दोन वेगळी क्षेत्र आहेत. पण, ‘सकाळ’ नेहमीच मराठी नाटक व मराठी नाट्य चळवळीच्या मागे उभे राहिले आहे. या महोत्सवात नाटकाचा प्रयोग करण्याचे समाधान वेगळेच असते. यावेळी आमच्या दोन कलाकृतींचा समावेश या महोत्सवात करण्यात आलेला आहे. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ यामध्ये केवळ कविताच नाही, धमाल किस्से, गाणी, आठवणी सादर केले जाणार आहे. त्यामुळे, तीन तास निखळ मनोरंजनाची खात्री आम्ही तुम्हाला देतो.

- संकर्षण कऱ्हाडे, लेखक व अभिनेते

सकाळ नाट्य महोत्सवात नाटकाचा प्रयोग होतोय याचा आनंद होत आहे. ‘ज्याला गाव नाही त्याला भाव नाही’ हे ब्रीदवाक्य असणारे ‘करून गेलो गाव’ हे मनोरंजनातून डोळ्यात अंजन घालणारे नाटक आहे. आपली जमिनी कशी जपली पाहिजे, याचा संदेश या नाटकातून दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वीही या नाटकाचा प्रयोग झाला आहे. तेव्हा, रसिकांनी या नाटकाला चांगला प्रतिसाद दिला होता. ‘सकाळ’ मुळे पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.

- भाऊ कदम, अभिनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com