पिंपरी - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोबत काही काळ विरगुंळा हवा असेल, ताण-तणाव विसरून खळखळून हसायचे असेल तर नाटकासारखे दुसरे माध्यम नाही. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूह’ पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांसाठी उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी घेऊन येत आहे..या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते व निर्माते भरत जाधव यांच्या उत्तमोत्तम कलाकृतींचा आस्वाद नाट्यरसिकांना घेता येणार आहे. म्हणूच हा महोत्सव ‘भरत जाधव विशेष नाट्यमहोत्सव’ असणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १९ ते २१ मेदरम्यान हा नाट्यमहोत्सव पार पडणार असून; रात्री ९ वाजता नाटकाच्या प्रयोगाला प्रारंभ होईल..भरत जाधव यांना नाटक, चित्रपट क्षेत्रातील ‘हास्यसम्राट’ म्हणून ओळखले जाते. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून आपल्या अभिनयाने त्यांनी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांची गाजलेली विनोदी नाटके सलग तीन दिवस अनुभवण्याची संधी पिंपरी चिंचवडमधील नाट्यरसिकांना मिळणार आहे..भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘पुन्हा सही रे सही’ या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाने १९ मे रोजी नाट्य महोत्सवाला प्रारंभ होईल. या नाटकात भरत जाधव हे चौरंगी भूमिका साकारत आहेत. यानंतर २० मे रोजी आचार्य अत्रे लिखित ‘मोरूची मावशी’ हे नाटक होईल. समारोप २१ मे रोजी ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने होईल.या संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत मिळणार आहे. फरांदे स्पेसेस हे नाट्य महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत. या नाट्य महोत्सवाचे तिकीट फोनद्वारे आगाऊ बुक करता येणार असून, तिकीट विक्रीला आजपासून सुरवात होत आहे..नाट्यमहोत्सवातील प्रयोगसोमवार (ता. १९ मे) - ‘पुन्हा सही रे सही’मंगळवार (ता. २० मे) - ‘मोरूची मावशी’बुधवार (ता. २१ मे) - ‘श्रीमंत दामोदर पंत’तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (तळमजला) १,२००प्रति नाटक तिकीट (तळमजला) ५००प्रति नाटक तिकीट (बाल्कनी) ४०० .अधिक माहितीसाठी संपर्क : ७७०९०९७१११फोनद्वारे बुकिंग करण्यासाठी संपर्क - ९६०२०२७६७६कुठे? केव्हा? कधी?कुठे : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहकेव्हा : १९ ते २१ मेकधी : रात्री ९ वाजता.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.