भोसरीत उद्या रंगणार ‘सकाळ श्रावणसरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Shravansari

उत्सवाच्या आणि उत्साहाच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याला साजेसा असा ‘सकाळ श्रावण सरी’ उत्सव सकाळ वृत्त समूह सखींसाठी घेऊन आला आहे.

भोसरीत उद्या रंगणार ‘सकाळ श्रावणसरी’

पिंपरी - उत्सवाच्या आणि उत्साहाच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याला साजेसा असा ‘सकाळ श्रावण सरी’ उत्सव सकाळ वृत्त समूह सखींसाठी घेऊन आला आहे. गुरुवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम रंगणार आहे.

गार्निअर ब्लॅक नॅचरल्स प्रेझेंट्स या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सह प्रायोजक आहेत. स्टार प्रवाह आणि सेन्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे इव्हेंट पार्टनर उडान आहेत. या उत्सवात अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम, श्रावणाची गाणी, मंगळागौरींचे खेळ रंगणार आहेत. तसेच, यानिमित्ताने गार्निअर हेल्दी हेअर काँन्टेस्ट, स्टार प्रवाहची सम्राज्ञी स्पर्धा, मराठमोळा फॅशन वॉक स्पर्धा आणि उखाणा स्पर्धेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात स्टार प्रवाह वाहिनीवरील सेलेब्रिटींशी गप्पा मारण्याचीही खास संधी मिळणार आहे.

स्पर्धांचे तपशील

गार्निअर हेल्दी हेअर काँन्टेस्ट -

सहभागी होण्यासाठी तुमच्या केसांचा एक छानसा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवावा. नैसर्गिक केसांसह फक्त एक चांगला फोटो असावा, एक्स्टेन्शन नसावे. यातून दहा उत्तम स्पर्धकांची निवड तज्ज्ञ करतील आणि त्यांना अंतिम फेरीसाठी स्टेजवर बोलावले जाईल. सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना बक्षिसे आणि भेटवस्तू दिली जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ८५९१७३४५१० या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

या स्पर्धेत स्पर्धकांना काही नवनवीन मजेदार खेळ खेळायचे आहेत. सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

सेन्को मराठमोळा फॅशन वॉक स्पर्धा

स्पर्धकांना मराठमोळा पारंपरिक साजशृंगार परिधान करून स्टेजवर येऊन रॅम्प वॉक करावा लागेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

उखाणा स्पर्धा -

स्पर्धकांना उखाणा घ्यायचा असून ‘सकाळ श्रावण सरी’ हा शब्द किंवा यातील कोणतेही एक किंवा दोन शब्द उखाण्यात येणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

  • माझी सुंदर केशरचना

  • एक मिनीट गेम शो

  • हिरवी राणी

  • पूजा थाळी सजावट

  • मेक अप सौंदर्या

  • उपवासाचा फराळ स्पर्धा

  • मेहंदी स्पर्धा

तुमच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि तुम्हाला खूप सारी बक्षिसे देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत विविध स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

Web Title: Sakal Shravansari In Bhosari Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalEventBhosariTomorrow