सकाळ वास्तू एक्स्पो : वर्तमानातील निवास; भविष्यातील गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Vastu Expo 2022

सध्या भाडेतत्वावर राहणाऱ्या, स्वत:चे घराचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि भविष्यातील गुंतवणूक म्हणून घराकडे पाहणाऱ्यांसाठी ‘सकाळ’ने घर घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ वास्तू एक्स्पो : वर्तमानातील निवास; भविष्यातील गुंतवणूक

पिंपरी - सध्या भाडेतत्वावर राहणाऱ्या, स्वत:चे घराचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि भविष्यातील गुंतवणूक म्हणून घराकडे पाहणाऱ्यांसाठी ‘सकाळ’ने घर घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तीही या विकेंडला अर्थात येत्या शनिवार व रविवारी.

स्वतःचं घर असावं, सुंदर बंगला असावा, रो-हाऊस असावे. किमान एखादी सदनिका असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी आपापल्या बजेटनुसार प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण, घराचं स्वप्न कुठे पूर्ण होणार. शहराच्या कोणत्या दिशेला घर घ्यायचं. आपल्या कामाच्या ठिकाणापासून ते जवळ असावं. सर्व सुविधांनी युक्त असावं. शिक्षण, मार्केट, वाहतुकीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने सोयीचं असावं. अशा अनेक अंगांनी विचार प्रत्येक जण करत असतो. पण, अशी घरं अर्थात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या बिल्डरांचे गृहप्रकल्प बघायचे म्हटले तर, एका दिवसांत केवळ एक किंवा दोनच साइट बघून होतात. आणखी घरं पाहता येत नाहीत. त्यांची माहिती लगेच मिळू शकत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन, नागरिकांच्या सोयीसाठी ‘सकाळ’ने शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता. २) चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड व पुण्यासह परिसरातील बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...

‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनातून पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे. तिथे प्रकल्पांशी संबंधित प्रतिनिधींसमवेत समोरासमोर बसून माहिती घेता येणार आहे. आमच्या तीन प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. ग्राहकांशी केलेल्या करारात नमूद वेळेच्या आत घराचा ताबा देण्यावर आम्ही भर दिला आहे. गेल्या पाच वर्षात एक हजार फ्लॅट आम्ही ग्राहकांना वेळेत दिले आहेत.

- अमित गव्हाणे, डी. आर. गव्हाणे, डेस्टिनेशन

आम्ही ‘सकाळ’च्या प्रत्येक एक्‍स्‍पोमध्ये सहभागी होत असतो. अशा एक्स्पोमुळे नागरिकांना एकाच छताखाली अनेक प्रकल्पातील घर बघता येतात. त्यामुळे घराबाबतचा निर्णय घेणे त्यांना सोपं जात. सध्या मोठ्या घरांना, जास्त कार्पेट असलेल्या घरांना पसंती दिली जात आहे. गुणवत्तापूर्ण बांधकामावर आमचा भर आहे. सध्या वीस ठिकाणी आमचे प्रकल्प सुरू आहेत. ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त ॲमिनिटीज दिल्या जात आहेत.

- योगेश चिंचवडे, मारुती मोरे, शालिग्राम ग्रुप

‘सकाळ वास्तू एक्स्पो’मधून नागरिकांना घर घेण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी. नागरिकांना परवडतील अशी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम करून घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस आम्ही व आमचे प्रकल्प उतरलो असून, त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करता येत असल्याचे समाधान आहे. सर्वसुविधा असलेल्या भागांमध्ये आमचे प्रकल्प आहेत.

- सागर मारणे, ए. व्ही. कार्पोरेशन

तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपासून हायक्लास सोसायटीतील नागरिकांचा विचार करून, घरांच्या निर्मितीवर आमचा भर आहे. त्यामुळे आमच्या सिल्व्हर ग्रुपचे सर्व प्रकारचे फ्लॅट्स आहेत. आपली कामगारनगरी असल्यामुळे कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांच्या अपेक्षाप्रमाणे , बजेटमधील घरे आम्ही उपलब्ध करून दिली आहेत. ‘सकाळ वास्तु एक्स्पो’मध्ये सर्व प्रकारच्या गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

- संतोष बारणे, सिल्व्हर ग्रुप

कधी?, कुठे?, केव्हा?

  • कधी - १ व २ ऑक्टोबर २०२२

  • कुठे - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

  • केव्हा - सकाळी ११ ते रात्री ८

  • संपर्क - ९८८१७१८८४०