चिंचवडमध्ये आजपासून ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Vastu Expo 2022

निवासासाठी अथवा गुंतवणूक म्हणून घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पोचे आयोजन केले आहे.

चिंचवडमध्ये आजपासून ‘सकाळ वास्तू एक्स्पो’

पिंपरी - निवासासाठी अथवा गुंतवणूक म्हणून घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (ता. १) सकाळी चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होईल. रविवारी (ता. २) रात्री आठला प्रदर्शनाचा समारोप होईल.

पूर्वेकडच्या चऱ्होली, दिघीपासून पश्चिमेकडील वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डीपर्यंत आणि उत्तरेकडील चिखली, तळवडे, डुडुळगाव मोशीपासून दक्षिणेकडून सांगवी, नवी सांगवी, दापोडीपर्यंत व त्यालगतच्या सर्व भागांतील गृहप्रकल्पांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. आपल्या मनातील घर कसे असावे, त्याचे बजेट किती असेल, याबाबत बांधकाम व्यावसायिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा करता येणार आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकल्पांची माहिती मिळाल्यामुळे घर घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सणासुदीच्या मुहूर्तावर स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. अगोदरच घर असेल तर, भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही घरांकडे पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे शनिवारी, रविवारी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देण्यासाठी वेळ राखीव ठेवा आणि घर बुक करण्याची संधी साधा. ‘वास्तू एक्स्पो’चे शनिवारी (ता. १) सकाळी साडेअकराला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

पिंपळकर यांचे उद्या व्याख्यान

प्रख्यात वास्तूतज्ज्ञ व ज्योतिर्विद्या पारंगत आनंद पिंपळकर यांचे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र विषयावर रविवारी (ता. २) दुपारी चार वाजता व्याख्यान होणार आहे. वास्तुशास्त्र काय आहे? त्याचे नियम फ्लॅटला लागू पडतात का? विना तोडफोड फ्लॅटमधील वास्तू वास्तूशास्राप्रमाणे करता येते का? अशा शंकांचे निरसन व्याख्यानाच्या माध्यमातून होणार आहे.

‘सकाळ वास्तू प्रदर्शन’ म्हणजे घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अद्वितीय पर्वणी आहे. येथे अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प एकाच छताखाली पाहता येतील. शहराचा वाढता विस्तार पाहता रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, होत आहेत. त्या दृष्टीने कनेक्टिव्हिटी, सोयीसुविधा, बांधकामाचा दर्जा, योग्य दर या बाबींचा विचार करूनच ग्राहकांनी घराचा निर्णय घ्यावा. ताबा मिळण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, तोपर्यंत व्याज किती भरावे लागणार आहे, त्याची किंमत पण जाणून घेणे गरजेचे आहे. डांगे चौक येथील ‘शिवम १९ ग्रँड वेस्ट’ हा टु आणि थ्री बीएचकेचा सर्व सोयीसुविधा युक्त परिपूर्ण असा रेडी पजेशन असलेला गृहप्रकल्प प्रदर्शनात सादर करीत आहोत.

- राज घनवट, संचालक, शिवम डेव्हलपमेंट व्हेंचर्स एलएलपी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात येऊन चार वर्षे झाली आहेत. पोलिसांसह पोलिस ठाणे व चौक्यांची संख्या वाढली आहे. रात्रीची गस्त वाढवली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस महिलेने गुंडांना पकडले. त्यांच्याकडून जिवंत काडतूस व हत्यारे जप्त केली आहेत. अशा प्रकारे पोलिसांचाही आत्मविश्वास वाढला आहे. रस्त्यावरची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काम केले जात आहे. लूटमार, चोरी असे गुन्हे नियंत्रणात आले आहेत. शिवाय, गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करून आरोपींना लवकर अटक करण्यावर भर दिला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी वस्त्यांमधील पालकांच्या बैठकी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण राहण्यायोग्य असून अधिक सुरक्षित झाले आहे.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

पायाभूत सुविधांमुळे शहर राहण्यायोग्य

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. रस्ते मोठे आहेत. समाविष्ट गावांमध्ये नवीन रस्ते केले आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर व जुना मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, आळंदी-पुणे पालखी मार्ग एकमेकांशी जोडले गेले आहेत. स्पाइन रस्त्यावरील त्रिवेणीनगर, निगडी-रावेत बीआरटी मार्गावरील शिंदे वस्तीतील रस्ता, पुलाचे रखडलेले काम मार्गी लावले जात आहे. बंगळूर आणि नाशिक महामार्गांचे सेवा रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने पूर्ण केले जाणार आहेत. नियोजित मेट्रो स्थानकांना अंतर्गत भागाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पीएमपी व रिक्षांसाठी मार्ग आखले आहेत. प्रशस्त रस्ते, स्वच्छता, पायाभूत सुविधांमुळे राहण्यायोग्य शहर आहे.

कधी?, कुठे?, केव्हा?

  • कधी : १ व २ ऑक्टोबर २०२२

  • कुठे : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

  • केव्हा : सकाळी ११ ते रात्री ८

  • संपर्क : ९८८१७१८८४०