
पिंपरी : आमदार सुनील शेळके यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. २) केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र दिले आहे. दरम्यान, राऊत यांचे आरोप बिन बुडाचे आहेत. राजकीय सूडबुद्धीने ते असे आरोप करत आहेत. त्यांनी मला पुरावे दिले तरच मी त्यांच्या आरोपाला उत्तर देईन, असे आव्हान आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.