sant tukaram sugar factory
sakal
- बेलाजी पात्रे
वाकड - सहा महिन्यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत जिल्ह्यातील आमदार खासदारांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्याने मागील दहा वर्ष संत तुकाराम कारखान्याच्या जडणघडणीत तन, मनं, धनाने भरीव योगदान देऊनही कारखाना निवडणुकीत डावललेल्या माजी संचालकांनी दादा, भाऊ, अण्णा, शेठ सांगा आमची चूक काय? आशा आशयाचे एक पत्रक काढून कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत एक लेटर बॉम्ब टाकला. उसउत्पादक शेतकऱ्यांना वाटप केलेल्या या निनावी पत्रामुळे अनुभवी माजी संचालकांची नाराजी हा सर्वाधारण सभेत चर्चेचा विषय ठरला.