esakal | पिंपरी : ‘कोरोनामुक्त’ शहर नसल्याने शाळा भरणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

School

पिंपरी : ‘कोरोनामुक्त’ शहर नसल्याने शाळा भरणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राज्याच्या शालेय शिक्षण (School Education) विभागाने ‘कोरोनामुक्त’ (Coronafree) गावांमध्ये गुरुवार (ता. १५) पासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मात्र पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा भरणार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी उद्योगनगरीतील मुलांना अद्यापही ऑनलाइनच (Online) शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे तूर्तास दिसत आहे. (School will not be Open not Corona Free Pimpri Chinchwad City)

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होत असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ऑनलाइन सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत सव्वा दोन लाख पालकांनी मते नोंदविली असून त्यातील जवळपास ८४ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा: पिंपरी : ३५ शाळांना मिळाला ४२ टक्के शुल्क परतावा

शाळा सुरू न करण्याच्या सूचना

या सर्वेक्षणाच्या अहवालातून शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षक आग्रही असल्याने ज्या गाव किंवा परिसरात एक महिन्यात एकही कोविड रूग्ण आढळला नाही, अशा परिसरात कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. परंतु पिंपरी चिंचवड शहरात कोविड परिस्थिती कायम असल्याने शाळा सुरू न करण्याच्या सूचना महापालिका शिक्षण विभागाला मिळाल्याची माहिती सहाय्यक शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी दिली.

‘शासनाकडून सर्व काही आलबेल आहे, असे चित्र निर्माण केले जाते. अशा सर्वेक्षणांचा उपयोग असतो, पण मर्यादित प्रमाणातच. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाहीत, ज्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नाहीत, तिथल्या पालकांनी हे फॉर्म कसे भरायचे? फॉर्म भरताना होणारे लॉबिंग कसे टाळणार?असे अनेक पालक आहेत. अशा कितीतरी बाबी आहेत. तूर्तास तरी पुणे जिल्ह्यातील शाळा सूरू होणार नाहीत.’’

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता मुख्याध्यापक महामंडळ

loading image