
"Schools Enforce Strict Tobacco Ban: No Smoking Zones Marked"
Sakal
पिंपरी : शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावरील निर्बंधांबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत, प्रत्येक मजल्यावर जिन्यासह तसेच लिफ्टच्या प्रवेशद्वारावर लाल रंगात ‘धूम्रपान निषिद्ध क्षेत्र’ लिहिलेली चिन्हे बंधनकारक केली आहेत. मात्र, बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांसमोर फलक लावण्यात आलेले दिसून येत नसल्याने या अभियानाचा केवळ ‘धूर’ निघाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.